कोरोना बाधितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची व्यवस्था पंचतारांकित हॉटेलमध्ये

पुणे दि. २८ एप्रिल २०२० :
आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र कोरोना बाधित रुग्णांवर उपचार तसेच रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टरांना विश्रांतीची अत्यंत आवश्यकता असते. हीच बाब लक्षात घेवून या डॉक्टरांच्या राहण्याची व्यवस्था पुणे स्टेशन परिसरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. त्याठिकाणी त्यांना आवश्यक त्या सर्व सोईसुविधा देण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला असून या डॉक्टरांचीही विशेष काळजी घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज दिली.
पुणे शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग विचारात घेत डॉक्टरांची मोठी टीम अहोरात्र कार्यरत आहे. आपल्या कुटुंबापासून दूर राहणे आवश्यक असल्याने प्रशासनाने या डॉक्टरांची राहण्याची वेगळी व्यवस्था केली आहे.
पुणे स्टेशन परिसरासह शहरातील व्हीव्हीआयपी विश्रामगृहासह हॉटेल ब्लू डायमंड, हॉटेल लेमन ट्री या पंचतारांकित हॉटेलमध्ये निवास व्यवस्था करण्यात आली आहे. डॉक्टरांसाठी दर्जेदार जेवण मिळावे, यासाठी नामांकित दोन केटर्सचीदेखील नियुक्ती करण्यात आली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी

एक प्रतिक्रिया

  1. श्रीधर उन्हाळे, पत्रकार,पोखरापूर, मोहोळ, सोलापूर.

    जीवाची पर्वा न करता केवळ मानवतावादी दृष्टिकोन ठेवून कोवीड -१९ रुग्णांची तपासणी करणा-या खाजगी डॉक्टरांना संरक्षण कवच /मानधन/राजाश्रय द्यावा……

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा