क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांची थकबाकी ३० टक्क्यांवर; ‘आरबीआय’ची माहिती

नवी दिल्ली, ९ मोर्च २०२३ : क्रेडिट कार्डवर मनसोक्त खरेदी करून नंतर परतफेड करू न शकणाऱ्यांचे प्रमाण वाढतच चालले आहे. गेल्या जानेवारीत क्रेडिट कार्डच्या थकबाकीने २९.६ टक्क्यांची मजल गाठून विक्रम केला आहे. रिझर्व्ह बँकेने याबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा क्रेडिट कार्डची थकबाकी २९.६ टक्के झाली असून, एकूण रक्कम १.८७ लाख कोटींची थकलेली आहे. गेल्या दहा महिन्यांतच २० टक्के थकबाकी वाढली आहे.

एसबीआय कार्डची थकबाकी वाढल्याने ११ महिन्यांपासून खर्चावर १ लाख रुपयांची मर्यादा घालण्यात आल्याचे व्यवस्थापकीय संचालक सीईओ राममोहनराव अमारा यांनी सांगितले आहे. थकबाकी वाढू नये, यासाठी हे निर्बंध घालण्यात आले आहेत. गेल्या जानेवारीत क्रेडिट कार्डवरून खरेदी करण्याचे प्रमाण १.२८ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले. डिसेंबर २०२२ मध्ये ते १.२६ लाख कोटी रुपये होते. क्रेडिट कार्डवरील व्यवहारांमध्ये गतवर्षीपेक्षा ४५ टक्क्यांची वाढ झाली आहे, असे सांगण्यात आले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा