पुण्यात जनता वसाहत परिसरात रिक्षा चालकाची हत्या करणार्‍या तिघांना अटक, अवघ्या एक तासात कारवाई

23

पुणे, १० अक्टोबर २०२२ : पुण्यामध्ये दत्तवाडी परिसरात किरकोळ वादातून रिक्षाचालकाच्या डोक्यात कोयत्याने वार करून हत्या करणार्‍या तिघांना दत्तवाडी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तुम्ही दारू पिउन संपले आहात, तुमच्यात दम राहिला नाही, असे बोलल्याच्या रागातून हे कृत्य केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. दत्तवाडी पोलिसांनी या तिघांनाही अवघ्या एका तासात जेरबंद केले आहे.

अक्षय रावडे रा. धायरी असे खून झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. तर विनोद वामन आल्हाट वय ३७, अनिकेत बाळु नांगरे वय २४, आकाश संतोष देवरुखे वय २६ तिघेही रा. दांडेकर पुल, दत्तवाडी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

क्षुल्लक वादातून जनता वसाहत परिसरामध्ये ही घटना घडली होती. पोलीस तपास करत असताना रिक्षाचालकाचा खून करणारे तिघेजण दांडेकर पुलाखाली थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी धाव घेत तिघांना ताब्यात घेतले.

पोलीस चौकशीत मृत अक्षय रावडे याने आरोपींना तुम्ही दारु पिवुन संपलेला आहे, तुमच्यात काही दम राहीलेला नाही, तुम्ही काय करु शकत नाही असे बोलला होता.
या रागातून आरोपींनी अक्षयला दुचाकीवर बसवून जनता वसाहत कॅनॉल रोड परिसरामध्ये नेले.त्याच्या डोक्यात आणि हातावर कोयत्याने वार करुन हत्या केल्याची कबुली दिली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा