पुणे दि.२६ मे २०२० : सोमवार दि.२५पासून देशांतर्गत विमानसेवा सुरु झालेली आहे. २५ मे रोजी ११ विमानाने ८२३ तर २६ मे रोजी ८ विमानाने ३४४ प्रवाशांचे असे एकूण ११६७ प्रवाशांचे पुणे विमानतळावर आगमन झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे.
या येणाऱ्या प्रवाशांबाबत पुणे महानगर पालिकेमार्फत थर्मल स्क्रिनिंग तसेच होम क्वारंटाईन सील ॲन्ड हेल्प डेस्कची सुविधा २४X७ करण्यात आली आहे.
पुणे विमानतळ येथे उतरणाऱ्या नागरिकांबाबत करावयाच्या कार्यवाहीबाबत मुख्य उड्डाण अधीक्षक अशोक घोरपडे यांची तर त्यांच्या सहाय्याकरीता प्र.सहाय्यक जनसंपर्क अधिकारी योगेश हेंद्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांनी याकामी जिल्हाधिकारी कार्यालयाचे राजशिषटाचार अधिकारी अमृत नाटेकर यांच्या संपर्कात राहण्याचे तसेच वेळोवेळी करण्यात येत असलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी: