दिल्ली: दुसत्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेचा ग्रोथ रेट ४.५ % एवढा आला आहे. मागील ६ वर्षातील हा सर्वात कमी समजला जात आहे. मागच्या २६ तिमाहीमधील ही सर्वात कमी ग्रोथ रेट मनाला जात आहे. तसा अंदाज काही तज्ञांकडून लवलाही गेला होता. देशाची ही ढासळणारी अर्थवयवस्था चिंतेचे कारण बनले आहे. या आधी २०१३ मध्ये एका तिमाहीत ४.३ एवढी गौथ बघायला मिळाली होती.
जागतिक मंदी आणि सरकारचे चुकलेले काही निर्णय यामुळे ही स्थिति निर्माण झाली असल्याचे संगितले जात आहे. अमेरिका आणि चीन या देशांमध्ये चालू असलेले व्यापार युद्धं आणि जागतिक अस्थिरता यांमुळे जागतिक मंदीची परिस्थिति निमण झाली आहे. त्याचा परिणाम भारतीय अर्थ व्यवस्थेवर बघायला मिळत आहे. कमी झालेली मागणी आणि त्यामुळे कमी झालेले उत्पादन याचा परिणाम अर्थ व्यवस्थेवत झाला आहे. तज्ञांचे असे म्हणणे आहे कि, अर्थ व्यवस्था आता या पेक्षा कमी पातळी गाठू शकत नाही. येथे अर्थव्यवस्था स्थिर होऊन त्यात वाढ होण्यास सुरवात होईल असे संगितले हात आहे.
तथापि याचा शेअर मार्केट वर फारसा परिणाम होणार नसल्याचे संगितले जात आहे. कारण गुंतवणूकदार याचा अंदाज लावून होते. त्यामुळे सोमवारी मार्केट थोडे पडेलही त्यानंतर ते पुन्हा नॉर्मल स्थितीत येईल असे संगितले जात आहे.