गोल पोस्ट इतर शुभेच्छा अरुण गवळी यांच्या कन्येचा अभिनेता अक्षय वाघमारे शी झाला साखरपुडा

अरुण गवळी यांच्या कन्येचा अभिनेता अक्षय वाघमारे शी झाला साखरपुडा

मुंबई: महाराजांनी घडवलेला स्वराज्यातील पहिल्या सर्जिकल स्ट्राइक वरील आधारित चित्रपट फत्तेशिकास्त नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला चांगली दादही मिळाली. गाजलेल्या या चित्रपटातील एका अभिनेत्याचे कुख्यात गँगस्टर व राजकारणी अरुण गवळी उर्फ डॅडी यांची कन्या योगिता गवळी सह विवाह होणार आहे. नुकताच या दोघांचा साखरपुडा देखील झाला आहे. या अभिनेत्याचे नाव आहे अक्षय वाघमारे.

हा साखरपुडा जवळच्या नातेवाईकांसह तसेच मित्र परिवार सह एका हॉटेलमध्ये करण्यात आला. हे वृत्त पुणे टाइम्स नाही जाहीर केले आहे. योगिता आणि अक्षय यांच्या साखरपुड्यासाठी अभिनेता क्षितिज दाते, मुग्धा परांजपे, विभावरी देशपांडे आणि हशिकेश देशपांडे ह्या कलाकारांनी उपस्थिती लावली.

अक्षय हा अभिनेता आहे, फत्तेशिकस्त या चित्रपटातून तो सगळ्यांच्या समोर आला. यात तो कोयाजी बांदल यांच्या भूमिकेत होता. अक्षयने ‘, ,दोस्तीगिरी, आणि ,बस स्टॉप, यांसारख्या चित्रपटांतून अभिनय केला आहे. शिवाय छोट्या पडद्यावर ‘ती फुलराणी’ मालिकेतही तो झळकला. “मी योगिताला गेल्या पाच वर्षांपासून ओळखतो. आमच्या कुटुंबीयांनी आम्हाला विवाहबंधनात अडकण्याचा सल्ला दिला. त्यानंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. आम्ही दोघंही आनंदी आहोत” असं अक्षय वाघमारेने ‘पुणे टाईम्स’ला सांगितलं. योगिता आणि अक्षय फेब्रुवारी २०२० मध्ये विवाहबंधनात अडकणार आहेत. अक्षय आणि योगिता एकमेकांना गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना ओळखत आहेत. दोघांच्याही कुटुंबियांनी त्यांना लग्नबंधनात अडकण्याचा सल्ला दिला. पुणे टाईम्सशी बोलताना अक्षय म्हणाला, ‘आम्ही दोघेही खूप आनंदी आहोत. कुटुंबियांनी लग्न करण्याचा सल्ला दिला तेव्हाच आम्ही लग्न करण्याचा विचार केला आणि मगच निर्णय घेतला.’

error: Content is protected !!
Exit mobile version