गोल पोस्ट गुन्हा अरुण गवळीला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका

अरुण गवळीला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका

मुंबई, दि.२२ मे २०२०: कुख्यात गँगस्टर अरूण गवळीला मुंबई उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. अरुण गवळी यांनी ताबडतोब जळोजा जेलला येण्याचे आदेश दिले आहेत. आता गवळी यांना जामीन मिळणार नाही, अशी उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंड पीठाने दिले आहेत.

डॅडीच्या मुलीचा विवाह सोहळा नुकताच पार पडला होता. या विवाह सोहळ्यासाठी त्याला जामीन देण्यात आला होता. मात्र अरूण गवळीने जामीन वाढवून मिळावा, अशी मागणी केली होती. यावेळी माझी गेल्या काही दिवसातील वागणूक चांगली आहे, असे कारण देत गवळीने जामीनात वाढ करण्यात यावी, अशी मागणी केली होती.

मात्र न्यायालयाकडून अरूण गवळीची मागणी अमान्य करत जेलमध्ये हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. एवढंच नाही तर अगोदर नागपुरच्या सेंट्रल जेलमध्ये असणाऱ्या अरूण गवळीला तळोजाच्या जेलला दाखल होण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

पॅरोल वाढवून देण्यासाठी फक्त वागणूक चांगली आहे हे एकमेव कारण असू शकत नाही, तसेच अशी कोणतीही तरतूद कायद्यात नाही, असे देखील न्यायालयाने यावेळी म्हटले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

error: Content is protected !!
Exit mobile version