गोल पोस्ट इतर शुभेच्छा गँगस्टर अरुण गवळीची मुलगी उद्या अडकणार विवाह बंधनात

गँगस्टर अरुण गवळीची मुलगी उद्या अडकणार विवाह बंधनात

मुंबई, दि. ७ मे २०२०: मुंबईच्या दगडी चाळीतील कुख्यात गँगस्टर अरुण गवळी यांची मुलगी योगिता व मराठी अभिनेता अक्षय वाघमारे ८ मे रोजी विवाह बंधनात बंधणार आहे. अशी माहिती खुद्द अक्षय वाघमारे यांनी माध्यमांशी बोलतांना दिली आहे.

या विवाह सोहळ्यासाठी मुंबई आणि पुणे पोलिसांची विशेष परवानगी घेण्यात आली असून हे दोघं उद्या( शुक्रवारी) विवाह बंधनात अडकणार आहेत. या दोघांचा हा विवाह २९ मार्च रोजी पार पडणार होता. मात्र , कोरोनामुळे संपूर्ण लॉकडाउन करण्यात आले आणि लग्न लांबणीवर पडले.

याबाबत एका वृत्त वाहिनीशी बोलताना अक्षय वाघमारे याने सांगितले की, आम्ही लग्नाच्या परवानगीसाठी पोलिसांकडे अर्ज केला होता आणि त्यांच्याकडून परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आम्ही ८ मे ही लग्नाची तारीख ठरवली. लग्नाची शॉपिंग आधीच झाली असल्यामुळे फारसा त्रास होणार नसल्याचे ते म्हणाले.

तसेच मुंबई येथील दगडी चाळीत हा विवाह सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला अरुण गवळी देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.

या लग्नसोहळ्यात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाणार असून सॅनिटायझर आणि फेस मास्क उपस्थित मंडळींना देण्यात येणार आहेत. उद्या संध्याकाळी हा लग्न सोहळा पार पडणार आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

error: Content is protected !!
Exit mobile version