अरुणाचलमध्ये ६५ किलोमीटर जमिनीवर चीन चा कबजा.

22

दिल्ली: बीजेपी चे नेता तापिर गाओ जय अरुणाचल प्रदेश मधील आहेत त्यांनी असा दावा केला आहे की चीनने अरुणाचल प्रदेश मधील ६० ते ६५ चौरस किलोमीटर च्या भूभागावर कब्जा केला आहे. लोकसभेमध्ये बोलताना त्यांनी ही माहिती दिली. त्यापुढे ते असेही म्हणाले की कदाचित अरुणाचल प्रदेश मध्ये पुढचा भूभाग हा डोकलाम असू शकतो.
भारत पाकिस्तान सीमेवरील घडामोडींना भारतीय मीडिया वरचढ करून दाखवत असतो परंतु चायनाने केलेल्या या कृत्याचे कोणत्याही मीडियावर दोन-तीन मिनिटांपेक्षा जास्त दाखवण्यात आले नाही. सीमा सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठा मुद्दा होऊ शकतो. चीन हा प्रकार नेपाळशी सुद्धा करत आला आहे आणि आता तेच कृत्य भारतीय सीमा सोबत करत आहे. या गोष्टींकडे वेळीच लक्ष दिले नाही तर चीन भारतासाठी ही मोठी समस्या बनू शकतो.
या भागांमध्ये चीन सैनिकांनी आपले कॅम्प बसवले आहेत. ६० ते ६५ चौरस किलोमीटर भूभाग म्हणजे हा खूप मोठा भूभाग आहे. तसं बघायला गेलं तर जगातील सर्वात चार लहान देशांचा भूभाग एकत्र केला तर तो एवढा भरेल. त्यांनी सांगितले की चायनाने च्यांगलागाम भागामध्ये पूल बनवला आहे ज्याच्या सहाय्याने चिनी सैनिक भारतात सहजतेने ये-जा करू शकतात. च्यांगलागाम भागामध्ये याआधीही २०१३ मध्ये चिनी सैनिकांनी घुसखोरी केली होती.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा