अरविंद केजरीवाल सरकारची घोषणा; बांधकाम कामगारांना ५००० रुपये मदतनिधी

नवी दिल्ली, २ नोव्हेंबर २०२२: देशाची राजधानी दिल्लीमध्ये प्रदूषणामुळे बांधकामांवर बंदी घालण्यात आली आहे‌. या पार्श्वभूमीवर बांधकाम कामगारांना पाच हजार रुपयांची मदत द्यावी असे निर्देश दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कामगार खात्याचे मंत्री मनिष सिसोदिया यांना दिले आहेत.

मागील काही दिवसांपासून दिल्लीची प्रदूषण स्थिती खराब बनलेली आहे. त्यामुळे गेल्या शनिवारी हवा गुणवत्ता समितीने राष्ट्रिय राजधानी क्षेत्रातील बांधकामे तसेच इमारतींच्या बांधकामांवर बंदी घातली आहे.

या निर्बंधामूळे बांधकाम कामगार बेकार झाले आहेत. तसेच दुसरे काही काम नसल्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कामगार मंत्री मनिष सिसोदिया यांना तातडीने कामगारांना पाच हजार रुपयांची मदत द्यावी असे आदेशात म्हटले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा