मुंबई, २८ ऑगस्ट २०२२: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला खिंडार पाडल्यानंतर शिवसेनेत अनेक महत्त्वाची पदे रिक्त झाली आहेत. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या पुन्हा नव्याने पक्षबांधणी करीत आहेत. उद्धव ठाकरेंकडून राज्यभरात नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच तीन महत्त्वाच्या पदांवरील नियुक्त्या जाहीर केल्या. यामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत शेवटपर्यंत राहणारे अरविंद सावंत आणि भास्कर जाधव यांना प्रमोशन मिळाले आहे. तर शिवसेनेचे वरिष्ठ नेते लीलाधर डाके यांच्या मुलावर उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने अरविंद सावंत, भास्कर जाधव यांची शिवसेना नेते पदी आणि पराग डाके यांची शिवसेना सचिव पदी वरणी लागल्यची चर्चा आहे तर अरविंद सावंत भास्कर जाधव यांची शिवसेना नेतेपद देऊन दोघाचही प्रमोशन करण्यात आले.
त्यामुळे एकनाथ शिंदेच्या बंडा मुळे पडझड झालेल्या शिवसेना किल्ल्याची आता उद्धव ठाकरे पुन्हा बांधयला सुरवात केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश जाधव