पुणे, २७ मार्च २०२१: ‘आर्यन्स् ग्रुप ऑफ कंपनीज’ ने आज आपल्या अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केले. कंपनीने आज २७ मार्च रोजी भव्य स्वरूपात उद्घाटन समारंभ करण्याचे आयोजित केले होते. मात्र, वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे सरकारच्या नवीन गाईड लाईनचे पालन करत कंपनीने मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत आपला कार्यक्रम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पाडला. कंपनी अनेक क्षेत्रांमध्ये आपले काम करत आहे. या आपल्या विविध प्रकल्पांमधून कंपनी तब्बल १,८०० पेक्षा जास्त रोजगार निर्मिती करणार आहे. इतकेच नव्हे तर यानिमित्ताने कंपनीकडून अनेक सामाजिक कार्य देखील केले गेले आहेत.
१० शाळांमध्ये ई-लर्निंग साधनांचे वाटप
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनाने राज्यातील सर्व शाळा पुन्हा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षभरात विद्यार्थ्यांचे या कारणामुळे मोठे नुकसान झाले आहे. याला पर्याय म्हणून सरकारने ई-लर्निंग मार्फत शाळा सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हे लक्षात घेत ‘आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज’ १० शाळांमध्ये ई-लर्निंग साधनांचे वाटप करणार आहे. यापैकी चार शाळांमध्ये वाटप करण्यात आले आहे. या शाळांची नावे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेटफळ- तालुका इंदापूर जिल्हा पुणे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोराटवाडी (न्हावी) तालुका इंदापूर जिल्हा पुणे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अशोक नगर तालुका इंदापूर जिल्हा पुणे, श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालय व्याहळी तालुका इंदापूर जिल्हा पुणे अशी आहेत.
या प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते. ज्यामध्ये ‘आर्यन्स् ग्रुप ऑफ कंपनीज’ चे सी ई ओ श्री. मनोहर जगताप, आर्यन्स ग्रुप चे सदस्य श्री.जोसवा श्री. विपुल बंसल- पी. एस. (प्रायव्हेट सेक्रेटरी) फायनान्स मिनिस्टर, श्री. बिंदू कुमार- पी. एस. मिनिस्टर ऑफ स्टेट फायनान्स मिनिस्टरी, श्री. डॉ. अजयभूषण प्रसाद पांडे- फायनान्स सेक्रेटरी, श्री. विवेक कुमार, पी. एस. टू पीएमओ (प्रधानमंत्री कार्यालय), श्री. प्रतिक दोशी- ओएसडी रिसर्च अँड स्ट्रॅटेजी डिपार्टमेंट पीएमओ, श्री. डॉ. राजीव कुमार- व्हाईस चेअरमन निती आयोग, श्री. अनुप वादुवा- सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, श्री. विवेक कुमार देवगन- ॲडिशनल सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ पॉवर आदी मान्यवर उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे