पुणे, २९ जून २०२३: आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज् च्या वतीने आज “माय ट्रेजरी पॅाकिट” ॲप सेवेचे अनावरण करण्यात आले. आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज् आधीपासूनच अनेक क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. आता डिजिटल मनी ट्रांजेक्शन सर्विस मध्ये देखील कंपनीने पाऊल टाकले आहे. याबरोबरच कंपनीने व्हाय.एम.सी.सी.एस या वित्त संस्थेला टेकओव्हर केले आहे.
काय आहे “माय ट्रेजरी पॅाकिट” ?
“माय ट्रेजरी पॅाकिट”ची वैशिष्टे ही आहेत की, याच्या साहाय्याने तुम्ही भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय व्यवहार हे मल्टीपल करंन्सी मार्फत करू शकता. हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये असणे म्हणजे खिशामध्ये मिनी बँक असल्यासारखेच आहे. कारण यावरून तुम्ही विविध लोन साठी अप्लाय करू शकता, विमापॉलिसी काढु शकता , तुमचे इतर इन्स्टॉलमेंट भरु शकता, शॉपिंगसाठी यु.पी.आय. पेंमेट करु शकता. इतकेच नाही तर तुमचे क्रेडिट कार्ड देखील या मार्फत आपण मॅनेज करू शकता. त्याचबरोबर विविध गव्हरमेंट पेंमेट ही करु शकता. सदर ॲप पूर्णतः आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज् च्या मालकीचे असून हे पूर्णपणे भारतीय आहे. या सेवेमध्ये कंपनीने तब्बल ५०० कोटी रुपये गुंतवणुक केली आहे. १५ ऑगस्ट २०२३ पासून हे सर्वासाठी सुविधेसाठी उपलब्ध होईल.
या माध्यमातुन छोट्या व्यावसायिकांना सुलभ रीतीने कर्ज उपलब्ध होणार आहे. कंपनीचे सीईओ आणि सीएफओ श्री. मनोहर जगताप यांनी छोट्या उद्योजकांना उभे करण्यासाठी अर्थसहाय्य करणार असल्याचे या आधीच घोषित केले होते.
याबरोबरच कंपनीने व्हाय.एम.सी.सी.एस चे मालकत्व स्वीकारले आहे. या बँकेच्या माध्यमातून कंपनीने बँकिंग क्षेत्रामध्ये आपले पहिले पाऊल टाकले आहे. बँकिंग क्षेत्रामध्ये भविष्यात कंपनी मोठ्या योजना आखत आहे. इतर बँकांप्रमाणे नेहमीच्या सेवा ही बँक तर देणार आहे.
आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज् चे संचालक श्री. अजय जगताप यावेळी म्हणाले की, “भारत डिजिटल ट्रांजेक्शन मध्ये जगात अव्वल स्थानावर आहे. मात्र, भारतात काही परकीय कंपन्यांचे यू.पी.आय ॲप्स उपलब्ध आहेत. याला पर्याय म्हणून आम्ही हे ॲप लॉंच केले आहे. या ॲपमध्ये सर्व गुंतवणूक आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज् ची असल्याने हे पूर्णतः भारतीय बनावटीचे आहे. भारतात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या ऑनलाईन ट्रांजेक्शनचा आकडा पाहता आम्ही भारतीय नागरिकांना नक्कीच उत्तम सेवा पुरवू.”
माय ट्रेजरी ॲप चे संचालक श्री. कामेश मोदी म्हणाले की, “आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज् आय.टी. क्षेत्रात देखील काम करत आहे. हे ॲप आमच्या कंपनीच्या आय.टी. टीमने बनवले असल्यामुळे यामध्ये कोणत्याही थर्ड पार्टी डेव्हलपर चा समावेश नाही. यामुळेच हे ॲप अतिशय सुरक्षित आहे. कमी शिक्षित व्यक्ती असो किंवा वृध्द सर्वजण हे ॲप सहजरित्या वापरू शकतात. हे ॲप १५ ऑगस्ट २०२३ तारखेपासून सर्वांना वापरण्यास उपलब्ध होणार होईल.”
यावेळी श्री. अजय जगताप, श्री. कामेश मोदी, श्री. संजय शेंडगे, श्री. संदीप राऊत, श्री. प्रवीण वानखेडे तसेच इतर मान्यवर व कर्मचारी उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी