‘आर्यन्स् ग्रुप ऑफ कंपनीज’ करणार सीएसपी तंत्रज्ञानाने वीज निर्मिती

पुणे, २८ मार्च २०२१: ‘आर्यन्स् ग्रुप ऑफ कंपनीज’ने काल  आपल्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पार पाडले. कंपनीने आपला हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडण्याचे आयोजित केले होते. मात्र, राज्यात कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक होत आहे. तसेच सरकारने देखील नवीन गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. याची दखल घेत कंपनीने आपला हा कार्यक्रम व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पार पाडला. या आपल्या विविध प्रकल्पांमधून कंपनी तब्बल १,८०० पेक्षा जास्त रोजगार निर्मिती करणार आहे.
यावेळी कंपनीने आपला महत्वकांशी प्रकल्प सोलर पावर प्लांट आणि सीएसपी म्हणजेच कॉन्सन्ट्रेटेड सोलार पॉवर चे उद्घाटन केले. रिन्युएबल एनर्जी मध्ये कंपनी महत्वाची भूमिका पार पाडत आहे. भारत देखील या सेक्टर मध्ये आपली एक वेगळी ओळख बनवत आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा वाढता धोका पाहता जागतिक स्तरावर कोळसा तसेच प्रदूषण पसरवणाऱ्या इतर इंधनांचा वापर कमी करण्यावर जोर दिला जात आहे. आता ‘आर्यन्स् ग्रुप ऑफ कंपनीज’ देखील या क्षेत्रात उतरले आहे.
सोलर पॅनल पासून वीज निर्मिती करणे ही प्रक्रिया सर्वांनाच माहीत आहे. कंपनी या तंत्रज्ञा मध्ये काम करत तर आहेच याव्यतिरिक्त कॉन्सन्ट्रेटेड सोलार पॉवर तंत्रज्ञानाचा वापर करून देखील कंपनी वीज निर्मिती करणार आहे. भारतात हे तंत्रज्ञान गेल्या आठ वर्षापासून वापरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र मोठ्या प्रमाणावर अजूनही हे तंत्रज्ञान भारतात वापरले गेलेले नाही. हे लक्षात घेता कंपनी या प्रकल्पावर आधारित अनेक प्रकल्प भारतात चालवणार आहे.
या अंतर्गत कंपनी राजस्थान, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि राज्यात माळशिरस येथे सोलर प्लांट आणि कॉन्सन्ट्रेटेड सोलार पॉवर प्लांट चालवणार आहे. या माध्यमातून वीज निर्मिती केली जाणार आहे.
कॉन्सन्ट्रेटेड सोलार पॉवर विषयी बोलायचे झाले तर आरशाच्या सहाय्याने सूर्यातून येणारी उष्णता एका ठराविक ठिकाणी केंद्रित केली जाते. ज्याच्या माध्यमातून विशिष्ट लिक्विड किंवा पाणी उच्च तापमानावर तापवले जातो. यातून तयार होणाऱ्या वाफेवर टर्बाइन्स फिरवली जातात. हीच प्रक्रिया कोळशाचा वापर करून केली जात आहे. मात्र यामुळे मोठ्या प्रमाणावर कार्बन-डाय-ऑक्साइडचे निर्माण होते जे पर्यावरणासाठी घातक आहे.
या प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते. ज्यामध्ये ‘आर्यन्स् ग्रुप ऑफ कंपनीज’ चे सी ई ओ श्री. मनोहर जगताप,’आर्यन्स् ग्रुप ऑफ कंपनीज’ चे सदस्य श्री. जोश्वा, श्री. विपुल बंसल- पी. एस. (प्रायव्हेट सेक्रेटरी) फायनान्स मिनिस्टर, श्री. बिंदू कुमार- पी. एस. मिनिस्टर ऑफ स्टेट फायनान्स मिनिस्टरी, श्री. डॉ. अजयभूषण प्रसाद पांडे- फायनान्स सेक्रेटरी, श्री. विवेक कुमार, पी. एस. टू पीएमओ (प्रधानमंत्री कार्यालय), श्री. प्रतिक दोशी- ओएसडी रिसर्च अँड स्ट्रॅटेजी डिपार्टमेंट पीएमओ, श्री. डॉ. राजीव कुमार- व्हाईस चेअरमन निती आयोग, श्री. अनुप वादुवा- सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, श्री. विवेक कुमार देवगन- ॲडिशनल सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ पॉवर आदी मान्यवर उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा