आर्यन्स मिडिया हाऊसने लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला खरी ओळख प्राप्त करून द्यावी- राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे

पुणे, 14 मे 2022: सध्या ‘आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज’ आपला यशोत्सव साजरा करत आहे. या अंतर्गत कंपनी आपल्या विविध प्रकल्पांचा शुभारंभ करत आहे. याला अनुसरूनच काल आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीजच्या आर्यन्स मेडिया हाऊसचं उद्घाटन करण्यात आलं. शुभारंभ सोहळ्यासाठी राज्याचे न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजयजी मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मुंडे यांच्या हस्ते रिबीन कट करून व दीप प्रज्वलन करून आर्यन्स मेडिया हाऊसचं उद्घाटन करण्यात आलं.


लोकशाही मजबूत ठेवणं ही माध्यमांची जबाबदारी- धनंजय मुंडे


यावेळी माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. ते म्हणाले की, “पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून एखादं मल्टिपल व्हिजन घेवून मीडिया हाऊस चालवणं हे खूपच जबाबदारीचं काम आहे, पण सद्याची माध्यमं खरंच आपली जबाबदारी पार पाडत आहेत का ? असा मोठा प्रश्न आपल्यासमोर ‘आ’ वासून उभा ठाकला आहे. त्यासाठी सर्वप्रथम माध्यमांनी अधिकारांच्या किंवा सत्तेच्या दुरूपयोगाला थांबवण्याची गरज आहे,” अशी अपेक्षा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.


पुढं मुंडे म्हणाले की, “सध्या माध्यमांचा वापर एक सत्ताकेंद्र किंवा अधिकार केंद्र म्हणून सर्रास केला जातो. कोणत्याही देशांत लोकशाही तेव्हाच बळकट होते, जेव्हा तिथली माध्यमे स्वतंत्र आणि निष्पक्ष असतात. काही निष्पक्ष माध्यमे प्रथेप्रमाणं आपल्या देशातही आहेत परंतु, पूर्वग्रहदूषितता आणि पक्षपाती पणानं त्यांनाही ग्रासलं.


आर्यन्स मिडिया हाऊसने लोकशाहीच्या चौथा स्तंभाला खरी ओळख प्राप्त करून द्यावी


दरम्यान, सद्याचा मिडिया कमकुवत झालेला दिसतोय. म्हणूनच आजच्या माध्यमांनी आत्मपरीक्षण करण्याची व लोकशाही अधिक बळकट होण्यासाठी जागल्याची भूमिका प्रभावीरित्या पार पाडण्याची गरज आहे. त्यासाठी आर्यन्स मिडिया हाऊसने निःपक्ष पत्रकरिता करून लोकशाहीच्या चौथा स्तंभाला खरी आणि योग्य ओळख प्राप्त करून देणं गरजेचं आहे.


“न्यूज अनकट” २४ तास न्यूज वाहिनी, “स्वरंग” इंफोटेन्मेन्ट मराठी वाहिनी, “सॉल्ट पिक्स”ओ.टी.टी चे लॉन्चिंग

 

आर्यन्स मीडिया हाऊस च्या माध्यमातून कंपनीने तीन दोन चॅनल आणि एक ओटीटी प्लॅटफॉर्मचं लॉन्चिंग केलं. न्यूज अनकट ही राष्ट्रीय वृत्तवाहिनी आहे तर स्वरंग ही सांस्कृतिक व मनोरंजन वाहिनी आहे. यासोबतच कंपनीने सॉल्ट पिक्स च्या माध्यमातून ओटीटी प्लॅटफॉर्म मध्ये देखील पदार्पण केलंय.


आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष मुकुंदराव जगताप यांनी प्रारंभी मंत्री ना. मुंडे यांचं स्वागत केलं. सीईओ मनोहर जगताप यांनी मिडिया हाऊस सुरू करण्यामागील भूमिका नमूद केली. यावेळी कार्यकारी संचालिका सौ. स्मिता शितोळे जगताप, ओमा फोंडेशनचे अध्यक्ष अजय जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष व माजी महापौर प्रशांत जगताप, एएसएम ग्रुपचे संचालक डॉ. संदीप पाचपांडे, एक्सर एनर्जीचे एम.डी. त्रिलोकनाथ यादव, अखिल भारतीय चित्रपट महामंडळ व नाट्य परिषदेचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, राकेश बांदल, लोकशाही पत्रकार महासंघाचे संस्थापक सचिन बोंबले, ज्येष्ठ पत्रकार विवेक ठाकरे आणि आदी मान्यवरांची यावेळी विशेष उपस्थिती होती.


आर्यन्स ग्रुपचे संचालक संजय शेंडगे, निखिल शितोळे, सुरेश रानवडे, मंजिरी हगवणे, कामेश मोदी, वैशाली ननवरे, वैशाली वाळुंज , स्नेहा जगताप, गोरख पवार, संदीप राऊत, नेहा जगताप, कैलास बागव, अशोक कांबळे, महेश रानवडे, संतोष गुजर, सुमित रानवडे, किरण लोहार, अमित रानवडे, किरण कानडे, ईश्वर वाघमारे या संचालकांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या संयोजनासाठी गृपचे इव्हेंट हेड प्रवीण वानखेडे, निखिल जाधव, अविनाश उबाळे, प्रवीण कदम, विलास कोंढाळकर, सतिष पाटील, गुरुराज पोरे यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.


न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा