तब्बल १६ मराठी कलाकारांनी केले नव्या मालिकेचे घरातून शूटिंग

मराठी मालिका विश्वातील पहिला प्रयोग

मुंबई, दि.१५ मे २०२०: सोनी मराठी वाहिनीवर नव्याने सुरू होणारी मालिका ‘आठशे खिडक्या नऊशे दारं’. या मालिकेच्या सर्व कलाकारांनी या कार्यक्रमाचे सर्व शूटिंग चक्क आपापल्या घरातूनच केले आहे. मराठी मालिका विश्वातील हा पहिलाच असा प्रयोग असल्याचे बोलले जात आहे.
या कार्यक्रमात १६ कलाकारांनी अभिनयासह स्वत:च चित्रीकरण, तर दिग्दर्शकाने घरुनच दिग्दर्शन केलं आहे.

लॉकडाऊनमुळे सध्या सगळेच मनोरंजन विश्व ठप्प झाले आहे. कुठेच शूटिंग नाही की, कोणतेही काम नाही. जा-तो आपल्या कुटुंबासोबत असल्याचे पहायला मिळत आहे. परंतु यावर या कलाकारांनी कल्पना शोधून काढली आहे. प्रत्येकाने आपापल्या घरीच मालिकेचं चित्रीकरण केलं आहे. या चित्रीकरणाबाबत दिग्दर्शकाने फोनवरून कलाकारांना सूचना दिल्या.

कोरोनामुळे आणखी किती दिवस काम बंद ठेवणार या विचाराने लेखक, दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले, स्वप्नील मूरकर, मारुती देसाई व इतर कलाकारांनी हा पर्याय शोधला.

मराठी मालिका विश्वातील हा पहिलाच असा प्रयोग आहे. या मालिकेत विशाखा सुभेदार, नम्रता आवटे, मंगेश कदम, आनंद इंगळे, समीर चौघुले, लीना भागवत यांच्यासह इतर कलाकारसुद्धा झळकणार आहेत. विशेष म्हणजे सातासमुद्रापार परदेशी असलेली सुव्रत जोशी व सखी गोखले ही जोडीसुद्धा यात दिसणार आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा