मंत्री बनताच ज्योतिरादित्य शिंदेंचं फेसबुक अकाऊंट हॅक, अपलोड झाले भाजप विरोधात व्हिडिओ

ग्वाल्हेर, ९ जुलै २०२१: केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे मोदी मंत्रिमंडळात सामील झाल्यानं त्यांचे फेसबुक अकाउंट हॅक झाल्याची बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्रमक भाषणाचा जुना व्हिडिओ कोणीतरी त्यांच्या फेसबुक वॉलवर दुपारी १२.२३ वाजता अपलोड केल्याचे सांगण्यात येत आहे. यात ते मोदी सरकारच्या उणीवा मोजताना दिसत आहेत. व्हिडिओ शिंदे कॉंग्रेसमध्ये असण्याच्या काळाचे आहेत.

ही बातमी पसरताच सायबर टीम सक्रिय झाली. हॅकिंग काही मिनिटांतच थांबविण्यात आल्याचा दावा केला जात आहे. यासह अपलोड केलेले जुने व्हिडिओ काढण्यात आले. ज्या डेटा सोबत छेडछाड केली गेली होती तो डेटा देखील परत रिकव्हर केला गेलाय. सर्व प्रथम, भोपाळमधील शिंदे समर्थक कृष्णा घाटगे यांनी याची पुष्टी केली आहे. गुरुवारी दुपारी माजी आमदार रमेश अग्रवाल यांच्या तक्रारीवरून ग्वाल्हेरमधील गुन्हे शाखा पोलिस ठाण्यात अज्ञात हॅकरविरोधात एफआयआर दाखल करण्यात आलाय.

मार्च २०२० मध्ये कॉंग्रेस सोडलेल्या आणि भाजपमध्ये सामील झालेल्या शिंदे यांचा बुधवारी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात समावेश झाला. त्यांना कॅबिनेट मंत्री बनवताना नागरी विमान उड्डाणची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आलीय. ते राज्यसभेचे खासदार आहेत.

खातं हॅक झाल्याच्या बातमीनं गोंधळ

शिंदे यांचं फेसबुक अकाउंट हॅक झाल्याच्या बातमीमुळं खळबळ उडाली. सायबर टीम त्यांच्या फेसबुक अकाउंट वर लक्ष ठेऊन होती. अशा परिस्थितीत, हॅकिंगची माहिती मिळताच तज्ञाने त्वरित पुढाकार घेतला. काही मिनिटांत हॅकिंग थांबविले गेलं. यानंतर अपलोड केलेले फोटो, व्हिडिओ हटविण्यात आले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा