मस्क ने ट्विटर चा ताबा घेताच अंम्बर हर्डचं प्रोफाईल गायब

पुणे, ४ नोव्हेंबर २०२२: टेस्लाचे प्रमुख एलोन मस्क यांनी मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर काही दिवसांनी नेटिझन्सच्या लक्षात आलं की त्यांची एक्स गर्लफ्रेंड आणि हॉलीवूड अभिनेत्री अंम्बर हर्डचं प्रोफाइल निष्क्रिय झालंय. ट्विटर च्या वापरकर्त्यांना अशी शंका आहे की अंम्बरनं ते अकाऊंट स्वतः बंद केलं की ते एलोन मस्क यांच्या आदेशांवरून हटवण्यात आलं.

दोघं पहिल्यांदा २०१३ मध्ये “मचेटे किल्स” च्या सेटवर भेटले होते, ज्यामध्ये हर्डनं अभिनय केला होता आणि मस्क यांनी फक्त एक छोटासा कॅमिओ केला होता. त्यावेळी मस्क त्यांच्या पत्नी तालुलाह रिले यांच्यासोबत होते आणि हर्ड ही तिचा पती डेपसोबत होती.

जॉनी डेपला घटस्फोट दिल्यानंतर अंबर आणि एलोन यांनी जवळपास दोन वर्ष एकमेकांना डेट केलं. अलीकडं अंम्बर हर्ड ही जॉनी डेप विरुद्धचा मानहानीचा खटला गमावल्यानं चांगलीच चर्चेत होती. जागतिक मीडिया व्दारे हा खटला मोठया प्रमाणात कव्हर केला गेला आणि सोशल मीडियावर त्यांच्या केसनं लोकांचं चांगलंच लक्ष वेधलं.

न्यूज अनकट प्रतिनिधि : केतकी कालेकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा