आचारसंहिता लागताच रायगड मध्ये विकासकामांचे फलक झाकण्यास सुरुवात

रायगड १८ मार्च २०२४ : केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांच्या तारखा शनिवारी जाहीर केल्या. त्यानुसार आता देशभरात आचारसंहिता लागू झाली आहे. विकासकामांचे फलक आता झाकण्यास सुरुवात झाली असून, त्या ठिकाणी आता मतदारांमध्ये जागृती करणारे फलक उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे विकासकामांच्या फलकांचे विद्रुपीकरण रोखण्यास मदत मिळून प्रशासनाला जगजागृतीसाठी काही कालावधीसाठी हक्काची जागा मिळणार आहे.

रायगडमधील अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणुकीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आचारसंहितेबाबत माहिती दिली. आचारसंहिता सुरु असताना सर्वांचेच आचरण कसे असायला पाहिजे आणि प्रशासनाने कोणकोणती तयारी केली आहे, याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

आचारसंहिता लागू झाल्यानंतर २४ तासांमध्येच ज्या ठिकाणी विकासकामांचे नामफलक असतात, ते कागद, कपड्याने झाकण्यात येतात. मात्र, त्यामध्ये एकसंघपणा नसल्याने ते चित्र फारच विद्रुप असल्याचे दिसते. यासाठी असे नामफलक झाकण्यासाठी तेथे मतदारांमध्ये जागृती करणारे फलक लावण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जावळे यांनी यावेळी घेतलाय. त्यामुळे लवकरच अशा ठिकाणी मतदारांना मार्गदर्शन करणारे फलक लावलेले दिसणार आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी : गणेश म्हाप्रळकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा