मुलगा ब्रेकअप करत नाही म्हणून बापानं मुलाच्या बाईकसह शेजारच्या सात बाईक जाळल्या….

चेन्नई, १५ डिसेंबर २०२०: प्रेमामधे प्रेमी युगुल नेहमीच काहीतरी विचित्र कृत्य करताना आढळतात. प्रेमाला यशस्वी करण्यासाठी वाटेल त्या थराला जातात. पण, तामिळनाडूच्या चेन्नई मधे एक उलटा प्रकार घडला आहे. ज्यामधे बापानंच असं कृत्य केलं ज्यामुळं अनेकांचं नुकसान झालं.

ब्रेकअप न करणाऱ्या मुलाला संतापलेल्या बापानं चक्क ८ बाईक ला आग लावली. तमिळनाडूतील चेन्नई मधे ही घटना घडली असून पोलिसांनी करनन नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. ही घटना समोर आल्यानं परिसरात खळबळ उडाली.

करननच्या मुलगा आरूण याचे एका मुलीशी प्रेमसंबध होते आणि ते लिव्ह इन रिलेशन शिप मधे राहत होते. याचाच विरोध करनन करत होते. त्यामुळं मुलाला गिफ्ट म्हणून दिलेली बाईक त्यानं जाळली आणि हा अपघात भासवण्यासाठी शेजारच्या ७ बाईकही जाळल्या.

करननच्या मुलाच्या प्रेमसंबंधाची शिक्षा एकट्या मुलाला मिळाली नसून त्यांच्या शेजाऱ्यांनाही देखील मिळाली. प्रेमप्रकरणातून नेहमीच अशा विचित्र घटना घडत असतात त्यामुळं हा प्रकार नविन नाही. मात्र, आजच्या काळात ही अश्या घटना घडणं म्हणजे एक प्रकारचं दुर्दैव होय.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा