असदुद्दीन ओवेसी यांनी खासदार जलील यांच्या घरी दिली सदिच्छा भेट

छत्रपती संभाजीनगर, २० फेब्रुवारी २०२४ : असदुद्दीन ओवेसी यांनी छत्रपती संभाजी नगरमध्ये खासदार जलील यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. भेटी नंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजप, काँग्रेस सहित इंडिया आघाडीवर निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना ओवेसी म्हणाले की, देशाच्या पंतप्रधानावर आता विश्वास राहिलेला नाही, भाजपने विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी फोडाफोडीचं राजकरण सुरु केल आहे. अशोक चव्हाण भाजप मध्ये गेले आणि खासदार झाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सेनेला साथ देत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केले त्याच वेळी आम्ही लोकशाही संपली असे सांगितले होते. स्वतःला सेक्युलर म्हणणारेच आता भाजप सोबत जात आहेत. आम्हाला इंडिया आघाडीकडुन अद्याप प्रस्ताव आला नाही. तरी मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार नाहीत यासाठी आम्ही सर्व घटक पक्ष एकत्रित होऊन निर्णय घेऊ. असे मत त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केल आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : संजय आहेर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा