गोल पोस्ट राष्ट्रीय आसाम हिंसाचार : २२ डिसेंबरपर्यंत शाळा, कॉलेज बंद

आसाम हिंसाचार : २२ डिसेंबरपर्यंत शाळा, कॉलेज बंद

नवी दिल्ली: नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात आसाममध्ये गत २ दिवसांपासून आगडोंब उसळला आहे. शुक्रवारी (दि.१३) देखील तणावपूर्ण वातावरण आहे.
दरम्यान आसाममधील या परिस्थितीमुळे शाळा कॉलेज २२ डिसेंबर पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
अजून ४८ तास इंटरनेट सेवा बंद ठेवली जाणार आहे.
आसाम, त्रिपुरामधील हिंसाचारामुळे आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत आसाममध्ये ३१ ट्रेन व अनेक फ्लाईट्स देखील रद्द केल्या आहेत. त्यामुळे अनेक प्रवासी आसाममध्ये अडकले आहेत. विविध भागामध्ये संचारबंदी असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेशातील अल्पसंख्यांकांना नागरिकत्व देणारे नागरिकत्व दुरुस्ती विधेयक संसदेत मंजूर झाले.
देशभरामध्ये विधेयकाला मोठा विरोध होत आहे. पूर्वोत्तर राज्यांमध्ये हा विरोध अधिक तीव्र दिसून येत आहे.
नॉर्थ ईस्ट स्टुडंट ऑर्गनायझेशनतर्फे पुकारलेल्या या आंदोलनात ३० संघटना सहभागी झाल्या आहेत. आसाम, मणिपूर, त्रिपुरा, मिझोरम, अरुणाचल तसेच मेघालय आदी राज्यांत आंदोलनामुळे जनजीवन पूर्ण ठप्प आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version