आसाम मध्ये आसामी भाषा लागू करणार

आसाम: २३ डिसेंबर २०१९ रोजी आसाम सरकारने आसाम मध्ये आसामी भाषा लागू करण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णया अंतर्गत आसामी भाषा काही भाग वगळता संपूर्ण राज्यात लागू होईल तसेच शाळांमध्ये किंवा सरकारी कार्यालयांमध्ये आसामी भाषेला प्राधान्य दिले जाणार आहे.

का गरज आहे याची?

बांगलादेश वरून येणाऱ्या शरणार्थी मुळे आसाम मध्ये बऱ्याचशा प्रमाणात परकीय भाषा मिसळली गेली आहे. रोहिंग्या मुस्लिम स्थलांतरित होऊन बांगलादेश मध्ये येत आहे परंतु तेथेही त्यांना राहण्यासाठी अडचणी होत असल्यामुळे तेथील काही रोहिंग्या मुस्लिम भारतातील बंगाल तर काही आसाम मध्ये स्थलांतरित होत आहेत.

देशभरात सीएबी विरोधात दंगली चालू आहेत त्यामध्ये पूर्ण देशांमध्ये वेगळ्या कारणास्तव या दंगली चालू आहेत तर आसाम मध्ये वेगळ्या कारणावरून या दंगली चालू आहेत. विशेषतः आसाम मधील दंगली जास्त तीव्रतेच्या आहेत. यामागचे कारण असे आहे की बांगलादेश मधून येणाऱ्या परकीय नागरिकांमुळे येथील जनतेला आपले स्वतःचे अस्तित्व गमावण्याची भीती वाटत आहे. आसामची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार तीन कोटी दहा लाख इतकी होती. त्यामध्ये ९१ लाख एवढी संख्या ही परकीयांची आहे. तसे बघायला गेले तर ही केवळ ३० टक्के आहे. त्यामध्येही ३० टक्के नागरिक हे हिंदू आहेत त्यामुळे नागरिकता सुधारणा कायदा २०१९ मुळे आसाम मधील नागरिकांना अशी भीती निर्माण झाली आहे की आलेले हे परकीय नागरिक इथेच स्थायिक बनून राहतील व आसाम मधील संस्कृती व भाषेवर मोठा परिणाम होईल.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा