आसाम राज्यात पावसाचा हाहा:कार ; भूस्खलनाच्या घडल्या घटना

आसाम (वृत्तसंस्था) दि.२जून २०२०: देशात जवळपास सर्वत्र मान्सूनचे आगमन होण्यास सुरुवात झाली आहे. पावसाने जून महिना सुरू होताच भारतात मुसळधार पडण्यास सुरुवात केली आहे. त्यातच या पावसाने आसाम राज्याच्या विविध भागात हाहा:कार माजवला असून भूस्खलनाच्या मोठ्या घटना घडल्याचे समोर आले आहे. या घटनांमध्ये सुमारे २० हुन अधिक जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.

भूस्खलनाच्या या घटना दक्षिण आसाममधील बराक घाटी परिसरात घडल्या आहेत. मृत्यू झालेल्यांमध्ये दक्षिण आसामधील तीन वेगवेगळ्या जिल्ह्यातील तीन वेगवेगळ्या व्यक्तींचा समावेश आहे.

गेल्या काही दिवसांपासून या भागात सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे या परिसरातील डोंगराळ भागात हे भूस्खलन झाले आहे. या भूस्खलनामध्ये कछार जिल्ह्यातील सात, हेलाकांडी जिल्ह्यातील सात आणि करीमगंज जिल्ह्यातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून या ठिकाणी बचाव पथकाला पाठवण्यात आले असून पुढील कारवाई करण्याचे काम सुरू आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा