असामान्य व्यक्तिमत्व ‘मनोहर पर्रीकर’

21

नवी दिल्ली : आजच्या तरुण पिढीला राजकारणाची परिस्थिती पाहून कुणाला समर्थन देऊ आणि काय भूमिका घेऊ असे झाले आहे. अशा या भयंकर दलदल असणार्‍या राजकारणात एकेकाळी एक कमळ उगवले होते.
भारताच्या छोट्याश्या राज्यात देशाचे नाव उज्वल करणारे व्यक्तिमत्व, गोव्याचे तीन वेळा मुख्यमंत्री असणारे आणि तरूणांना आदर्श असणारे भाजपचे कॅबिनेट मंत्री, भारताचे माजी संरक्षण मंत्री अर्थात दिवंगत मा.मनोहर पर्रीकर.

१३ डिसेंबर रोजी त्यांचा कोकणातील म्हापसा या गावी त्यांचा जन्म झाला. मडगाव येथे माध्यमिक शिक्षण घेतलेल्या पर्रिकरांनी आयआयटी मुंबई येथून इंजिनिअरिंग पूर्ण केली.

IIT ची डिग्री असणारे ते पहिले मुख्यमंत्री होते. आधुनिक धोरण ठेवणारा मुख्यमंत्री राज्याला देशात वेगळं स्थान निर्माण करून देतो हे गोवा आणि पर्रिकरांच्या उदाहरणातून सिद्ध होते.
साधे राहणीमान आणि स्वच्छ प्रतिमा असलेला पर्रिकरांनी गोव्याच्या राजकारणात तीन दशक आपला दबदबा राखला. राजकीय अस्थिरता, वेश्याव्यवसाय, जुगारी लाकांचा अड्डा आणि आर्थिकदृष्टया दुर्बल अशी अवस्था असणार्‍या गोव्याला पर्रिकरांनी देशातील मुख्य पर्यटन स्थळांपैकी एक असा दर्जा मिळवून दिला. त्यांच्या असामान्य व्यक्तिमत्वाचे आणि सामान्य राहणीमानाचे अनिक किस्से सर्वश्रूत आहे.

सरकारने दिलेल्या मुख्यंत्री सदनातन राहता त्यांनी आपल्या जुन्याच घरात राहणे पसंद केले. मुख्यमंत्री असतानाही राज्याच्या संसद भवनात जाताना गाड्यांचा ताफा न नेता स्कूटरवरून जाणारे ते पहिले राजकारणी असतील.

गोवा फिल्म फेस्टिवलच्यावेळी उद्घाटन समारंभादरम्यान पर्रिकर पोलीसांबरोबर बाहेर ट्राफिक सांभाळण्यास मदत करत होते. इतकंच काय स्वादुपिंडाच्या कॅन्सरशी झुंज देत असताना नाकात नळी आणि कंबरेला युरीन बॅग अशा अवस्थेत त्यांना संसदेत येऊन राज्याचा वार्षिक अहवाल सादर केला होता.

देशाचे संरक्षण मंत्री असताना उरी दहशतवादी हल्याला उत्तर म्हणून पाकव्याप्त काश्मिरमध्ये घडवलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. देशाच्या शत्रुशी हिमतीने टक्कर देणार्‍या या महान नेत्याला अतिशय दुर्मिळ आणि गंभीर अशा स्वादुपिंडाच्या कॅन्सरशी लढताना हार मानवी लागली. आणि १७ मार्च २०१९ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.

भारताच्या इतिहासातील साधा आणि स्वच्छ प्रतिमा असणार्‍या दिवंगत मनोहर पर्रिकर यांना भावपूर्ण आदरांजली…

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा