आसाममध्ये जमावाकडून पोलिसांना मारहाण

12

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आसाममध्ये दोन पोलीस जवानांना जमावाकडून मारहाण झाल्याची घटना समोर आली. ही घटना आसाममधील नगाव जिल्ह्यात राहा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. पोलीस एका प्रकरणाचा तपास करण्यासाठी घटनास्थळी गेले होते, तेव्हा जमावाकडून या पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, मिनकपुर भागातील राहणाऱ्या एका रहिवाशाने सांगितले की आरोपी हिरक ज्योति नाथ आणि त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या गटावर हल्ला केला होता. ते म्हणाले की जेव्हा पोलीस आरोपींच्या घरी पोहचले आणि त्यांच्या आई आणि बहिणीला काही प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी पोलिसांवर हल्ला केला. पुढे त्यांनी सांगितले की आरोपी आणि काही इतर लोकांनी पोलिसांच्या गटावर हल्ला केला. पोलीस अधिकारी आणि एका शिपाई जखमी झाले. त्यानंतर पोलीस स्टेशनमधून आलेल्या एका गटाने त्यांची या जमातून सुटका केली.

या भागात राहणाऱ्या एक तरुण हिरक ज्योती नाथ आणि त्यांच्या नातेवाईकांच्या विरोधात असलेल्या केसच्या संदर्भात चौकशीसाठी आले होते. हिरक याच्या विरोधात हिरक यांच्या पत्नीकडून केस दाखल आहे. मागील काही महिन्यापासून शारीरिक छळ करण्याचे प्रकरण हिरक यांच्या पत्नीकडून दाखल आहे. हिरक याची पत्नी ५ महिन्याच्या मुलाची आई आहे. महिलेच्या नातेवाईकांनी पोलिसात हिरक आणि त्यांच्या कुटूंबातील सदस्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.

जेव्हा आतिरिक्त पोलीस प्रुफल्ल बोरा यांच्या नेतृत्वात तीन सदस्यांचा पोलिसांचा गट या भागात पोहचला तेव्हा त्यांच्यावर जमावाकडून हल्ला करण्यात आला. पोलिसांवर हल्ला करणाऱ्या लोकांमध्ये आरोपी हिरक आणि त्याची आई तसेच कुटूंबातील सदस्य सहभागी होती. पोलिसांना मारहाण करण्यात तेथील स्थानिक लोकांनी साथ दिली.

जमावाने पोलीस अधिकाऱ्यांना पकडून झाडाला बांधले आणि त्यांना मारहाण केली. पोलीस अधिकाऱ्यांचे केस देखील कापण्यात आले. घटनेनंतर तात्काळ एका शिपायाने पोलीस स्टेशनच्या मुख्य अधिकाऱ्याला ही माहिती दिली. त्यानंतर दाखल झालेल्या पोलिसांनी जमावाच्या कचाट्यातून पोलीस अधिकाऱ्यांना सोडवले. ज्यानंतर जखमी पोलीस अधिकाऱ्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा