बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी आसारामला मिळाला जामीन,सुटका होण्याची शक्यता नाही.

जोधपूर,राजस्थान १ मे २०२३ : २०१७ मध्ये सुप्रीम कोर्टात आसारामच्या वतीने जोधपूर सेंट्रल जेलच्या दवाखान्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्यात आले होते, ज्यामध्ये आसारामच्या अनेक गंभीर आजारांचा उल्लेख करण्यात आला होता. न्यायालयाने या प्रमाणपत्राची चौकशी केली असता हे प्रमाणपत्र बनावट असल्याचे निष्पन्न झाले.

याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आसारामचे वकील रवी राय यांच्याविरुद्ध जोधपूरच्या रतनदा पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आणि आसारामलाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले.

बनावट प्रमाणपत्र प्रकरणी, जामिना साठी जोधपूर उच्च न्यायालयात आसारामची बाजू वकील नीलकमल बोहरा आणि गोकुलेश बोहरा यांनी मांडली. या प्रकरणी सुनावणी करताना न्यायमूर्ती कुलदीप माथूर यांनी आसारामला जामीन देण्याचे आदेश दिले.

परंतु आसाराम सध्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे, त्यामुळे जामीन मिळूनही तो तुरुंगातून बाहेर पडू शकणार नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी: गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा