आशा वर्करचा ‘कोविड योद्धा’ म्हणून प्रशस्तीपत्र देऊन सन्मान

हडपसर, १६ ऑगस्ट २०२०: समता सेवाभावी संस्था आणि परिवर्तन महिला आधार केंद्राच्या वतीने स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला व आशा वर्कर यांचा गौरव करण्यात आला. जागतिक महामारी अशा कोरोना या रोगांविषयी कार्य करणाऱ्या लोकांना प्रेरणा देणारा आहे. तळा – गळा मध्ये जाउन सर्वसामान्य नागरिकांच्या घरोघरी जाऊन तपासणी व सर्व्हे करण्याचे पुणे शहरांमध्ये सर्वात मोठे कार्य या ‘आशा वर्कर’ करत आहेत.

कार्य ही आरोग्यसेवा बरोबरच सेवाभावीवृत्तीचे आहे. ‘आशा’ वर्करमुळे पुणे शहरामध्ये आज कोरोना रोगावर मात मिळण्यामध्ये प्रशासन यशस्वी होताना दिसत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्वातंत्र्यासाठी आजच्या पिढीला बलिदान देता आले नाही. परंतु, संपूर्ण जगावर कोरोनाच्या रूपाने आलेल्या संकटामध्ये आपल्या सेवाभावी वृत्तीने समाजाला दिशा देण्याचे कार्य ‘आशा वर्कर’ खऱ्या अर्थाने करत आहेत. “कोविड योद्धा” म्हणून स्वातंत्र्याचा दिनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

“अतिशय अभिमानाची बाब आहे”. असे मत परिवर्तन महिला आधार केंद्रच्या संस्थापिका शोभा लगड यांनी व्यक्त केले. यावेळी वर्षा शिंदे, स्मिता सोंडे, संदिप राऊत, महेश टेळेपाटील, यांनी आपले विचार मांडले

यावेळी उपस्थित पूजा तोंडे, स्मिता सिरसाट, संगीता पवार, राणी फरांदे, फर्जना शेख, नीता जाधव, भाग्यश्री निगमे, वर्षा वानखेडे, सारिका जाधव, माधुरी इंगळे, रेवती कुलकर्णी, सुचित्रा गुप्ता आदी महिलांचा “कोविड योद्धा”म्हणून प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. सोशल डिस्टन्सच्या सर्व नियमांचे पालन करून सुनिता रायकर, छाया दांगट यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा