भोकरदन, १६ फेब्रुवारी २०२४ : भोकरदन तालुक्यातील श्री छञपती संभाजी विद्यालयातील प्रांगणात तादुंळवाडीतील ८७ कामगारांना आशाताई मुकेश पांडे यांच्या हस्ते कीटचे वाटप करण्यात आले. तर मानव विकास मिशन अंतर्गत श्री छञपती संभाजी विद्यालयातील २६ मुलींना सायकली वाटप करण्यात आल्या. दरम्यान यावेळीआशाताई मुकेश पांडे यांचे विद्यालयाचे प्राचार्य संजय पैठणकर, संरपंच रामेश्वर चिकटे, तादुंळवाडीतील महिलांनी विठ्ठलाची मूर्ती देऊन स्वागत केले.
यावेळी आशाताई मुकेश पांडे यांनी तादुंळवाडीतील विविध विकास कामे केंद्रीय राज्य मंञी ना. श्री. रावसाहेब पाटील दानवे व आमदार संतोष पाटील दानवे यांच्या माध्यमातून करण्यात आली असून उर्वरित कामे मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात आली आहे, याबद्दल माहिती दिली, त्याचप्रमाणे केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनेचा लाभ शासन आपल्या दारीच्या माध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यात आल्याचे सांगितले. श्री छञपती संभाजी विद्यालयात नेहमीच मुलीची संख्या जास्त असते त्या अनुषंगानेच बाहेर गावाहून येणाऱ्या मुलीची पायपीट थांबविण्यासाठी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी २६ मुलींना मोफत मानव विकास मिशन अंतर्गत सायकली आपण वाटप करीत आहोत. तेव्हा मुलींनी दररोज शाळेत येऊन शिकले पाहिजे, आता तर मुलींना उच्च शिक्षणही मोफत झाले आहे. तेव्हा आपण खूप शिका, मोठ व्हा !असे आवाहन आशाताई मुकेश पांडे यानी केले. मानव विकास मिशन अंतर्गत मोफत सायकल वाटप केल्याबद्दल मुलीची पायपीट बंद झाल्याबद्दल पालकांनी यावेळी आनंद व्यक्त केला. यावेळेस प्राचार्य संजय पैठणकर, संरपंच रामेश्वर चिकटे, दत्तात्रय चिकटे माऊली यांनीही गावकरी व विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास माजी जि. प. सदस्य कडुबा दादा खरात, डाॅ नारायण चिकटे, संरपंच रामेश्वर चिकटे, विलास पा सावंत, भगवान राव चिकटे ,प्रकाश पाटील सावंत, उपसरपंच कैलास ढवळे, नामदेवराव चिकटे, कृष्णा पाटील चिकटे, कैलास आहेर,गजानन चिकटे, रावसाहेब दसपुते, आप्पा सोनवणे, सुनील वेलदोडे, हरिदास वेलदोडे, जनार्दन चिकटे, दिपक चिकटे, दिनेश चिकटे, के.व्ही फुके, डी बी ठाकरे, पी एम पाटील,मोहित जयस्वाल, राजेंद्र डेडवाल, प्रा अंकुश जाधव, प्रा भगवान जाधव, सौ ऊषाताई खैरे, सौ कमलताई सोनवणे, प्रा सौ आशाताई ठाकूर, जनार्दन सुरासे,हरिदास गव्हाड, मुनिर शहा भंडारे,सह तादुंळवाडीतील ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, लाभार्थी, महिला, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाचे सुञसंचलन डी. बी. ठाकरे यांनी केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : कमलकिशोर जोगदंडे