गोल पोस्ट राजकारण आशिष देशमुख यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश, भाजप देशमुखांना न्याय देईल, देवेंद्र फडणवीस यांची...

आशिष देशमुख यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश, भाजप देशमुखांना न्याय देईल, देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

नागपूर १८ जून २०२३ : विदर्भातील काँग्रेसचे नेते, माजी आमदार आशिष देशमुख यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आशिष देशमुख यांनी भाजपत प्रवेश केला. काही दिवसांपूर्वी आशिष देशमुख यांना काँग्रेसने निलंबित केले होते. आता आज त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजीव पोतदार, जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, नागपूर शहराध्यक्ष प्रविण दटके, माजी आमदार अशोक मानकर यांच्यासह इतर भाजप नेते आणि आशिष देशमुख यांचे समर्थक मोठ्या संख्यने यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना भाजप आशिष देशमुख यांना भाजप न्याय देईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

यावेळी पुढे बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आशिष देशमुख हे पूर्वीपासूनच भाजपचे होते. मध्यंतरी ते आम्हाला सोडून बाजूला गेले. परंतु आता ते परत स्वगृही आलेले आहेत. त्यांचा आजचा भाजप प्रवेश हा त्यांचा अंतिम पक्षप्रवेश असेल असे फडणवीस म्हणाले. त्याचबरोबर आशिष देशमुख हे येथून पुढे सार्वत्रिक निवडणुका लढवणार नाहीत. परंतु भाजप त्यांना योग्य ठिकाणी संधी देईल त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असेही फडणवीस यावेळी म्हणाले

न्यूज अन कट प्रतिनिधी – अनिल खळदकर

error: Content is protected !!
Exit mobile version