अशोक चव्हाण यांची प्रकृती स्थिर ;अतिदक्षता विभागातून आणले बाहेर

नांदेड, दि.२८, मे २०२० : सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली आहे, परंतु आता त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले आहे.

अशोक चव्हाण यांना अतिदक्षता विभागातून सामान्य कक्षात हलविण्यात आले आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने अशोक चव्हाण हे मागील दोन आठवडे मुंबईत होते.
त्यानंतर नांदेड येथे १९ मे रोजी परतल्यानंतर अशोक चव्हाण घरातच होम क्वॉरंटाईन करण्यात आले होते. त्यांना कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यामुळे त्यांनी स्वॅब तपासणीसाठी दिले असता, त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथील ब्रीजकँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सद्यस्थितीत त्याची प्रकृती चांगली असल्याने त्यांना अतिदक्षता विभागातून सामान्य कक्षात हलविण्यात आले आहे. त्यांचे कुटुंबिय मुंबईकडे रवाना झाले असून पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण, कन्या जया व सुजया या नांदेड येथून मुंबईकडे रवाना झाल्या आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा