पुरंदर, २८ डिसेंबर २०२०: महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाच्या पुणे विभागीय उपाध्यक्षपदी पुरंदर तालुक्यातील कोथळे येथील विद्या महामंडळ प्रशालेचे कलाशिक्षक अशोक नंदराज साबळे यांची निवड करण्यात आली आहे.
अशोक साबळे यांनी यापूर्वी पुरंदर तालुका कलाशिक्षक संघाचे अध्यक्ष, पुणे जिल्हा संघाच्या उपाध्यक्षपदा वर कार्यक्षम पणे काम केले आहे. गेली १५ वर्षे साबळे यांनी कला शिक्षकांच्या मागण्या संदर्भात आंदोलन केले, कला शिक्षकांचे मेळावे घेतले, प्रशिक्षण, तसेच मुख्याध्यापक व कलाशिक्षकांचे पुरस्कार देऊन गौरव केले, चित्रकलेच्या विविध स्पर्धेत तालुक्यातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन, शासकीय चित्रकला परीक्षेत अधिक मुले सहभागी करण्यासाठी अशोक साबळे यांचे मोठे योगदान आहे.
महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाचे अध्यक्ष विनोद इंगोले, उपाध्यक्ष प्रल्हाद शिंदे, राज्यसचिव प्रल्हाद साळुंखे यांनी पुणे विभागीय उपाध्यक्षपदी अशोक साबळे यांची निवड केली आहे. राज्य संघटनेचे पदाधिकारी किरण सरोदे, मिलिंद शेलार, हुसेन खानचाचा, राजेश निबंकर, नवाब शहा आदींनी त्यांचे अभिनंदन केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे