आशिया कप २०२५ मध्ये टीम इंडियाच्या मोहिमेची धमाकेदार सुरुवात आज होणार आहे. गतविजेता भारताचा सामना यजमान यूएईविरुद्ध रात्री ८ वाजता दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार नाणेफेक संध्याकाळी ७:३० वाजता होईल.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारत ९व्यांदा आशिया कप जिंकण्याचे ध्येय ठेवून मैदानात उतरणार आहे. भारताने यापूर्वी तब्बल ८ वेळा आशिया कप जिंकून विक्रम प्रस्थापित केला आहे. याउलट, मुहम्मद वसीमच्या नेतृत्वाखाली यूएईचा संघ मोठे आव्हान उभे करण्यास सज्ज आहे.
चाहत्यांसाठी खास आनंदाची बातमी म्हणजे हा सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केला जाणार आहे. तसेच, भारताचे प्रमुख सामने पुढीलप्रमाणे आहेत –
- १० सप्टेंबर : भारत विरुद्ध यूएई – दुबई – रात्री ८ वा
- १४ सप्टेंबर : भारत विरुद्ध पाकिस्तान – दुबई – रात्री ८ वा
- १९ सप्टेंबर : भारत विरुद्ध ओमान – अबू धाबी – रात्री ८ वा
- २८ सप्टेंबर : अंतिम सामना – दुबई – रात्री ८ वा
या स्पर्धेत शुभमन गिल, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि रिंकू सिंगसारखे खेळाडू भारतासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. दुसरीकडे, यूएईचा संघ स्थानिक खेळाडूंसह भारतीय संघाला आव्हान देण्यासाठी सज्ज आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड












































