राष्ट्रीय हॉकी खेळाडू वैष्णवी फाळके हिला श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी प्रोत्सानपर दिले एक लाख रुपये बक्षीस

सातारा, फलटण २६ऑक्टोबर २०२३ : नुकत्याच झालेल्या एशियन गेम्स स्पर्धेमध्ये भारतीय हॉकी संघाने ब्राँझ पदक मिळवले. या स्पर्धेत भारतीय संघात साताऱ्यातील फलटण तालुक्यातील आसू गावची कन्या, वैष्णवी विठ्ठल फाळके सामील होती. पूर्ण स्पर्धेत तिच्या उत्कृष्ट खेळीने भारतीय संघ पदकापर्यंतची कामगिरी करू शकला. तिच्या या कामगिरीसाठी आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी प्रोत्सानपर १ लाख रुपये बक्षीस तिला दिले आहेत.

वैष्णवी विठ्ठल फाळके हिचा नुकताच सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी तिला महाराष्ट्र राज्य खोखो असोसिएशन चे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी १ लाख रुपये देणार असे जाहीर केले होते. आज आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण येथील सरोज व्हीला या आपल्या निवासस्थानी वैष्णवीचे वडील विठ्ठलराव फाळके यांना १ लाखाच्या चेक चे वितरण केले.

वैष्णवी फाळकेने तिच्या उत्कृष्ट खेळीने एशियन गेम्स स्पर्धेमध्ये भारतीय महिला हॉकी संघाला ब्राँझ पदक मिळवून दिले. यामुळे तिने सातारा जिल्ह्याची मान उंचावली आहे .या कन्येचा आम्हाला आभिमान आहे.असे गौरोवोदगार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले. या वेळी सातारा जिल्हा मजूर फेडरेशन चे चेअरमन प्रमोद अण्णा झांबरे, श्रीराम कारखान्याचे संचालक स्वामी साबळे, शिवाजीराव माने, पोलीस पाटील अशोक गोडसे पाटील, साबळे सर, सचिन पवार उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतीनिधी : आनंद पवार

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा