गोल पोस्ट राष्ट्रीय आसाम : रुग्णवाहिकेतून १४ कोटींहून अधिक किंमतीचे २०० ग्रॅम हेरॉइन जप्त

आसाम : रुग्णवाहिकेतून १४ कोटींहून अधिक किंमतीचे २०० ग्रॅम हेरॉइन जप्त

गुवाहाटी, १४ डिसेंबर २०२२ : गुवाहाटी शहर पोलिसांनी मंगळवारी रात्री एका रुग्णवाहिकेतून ५०,००० याबा गोळ्या आणि १४ कोटींहून अधिक किंमतीचे २०० ग्रॅम हेरॉइनसह मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित औषधे जप्त केली आणि या प्रकरणात एका व्यक्तीला अटक केल्याचे सहपोलिस आयुक्त पार्थ सारथी महंता यांनी सांगितले.

याबाबत माहिती देताना पार्थ सारथी महंता म्हणाले की, अटक करण्यात आलेल्या व्यक्तीची ओळख पटली असून मिरजोल इस्लाम असे त्याचे नाव आहे. जप्त केलेल्या औषधांची अंदाजे किंमत १४.१० कोटी रुपये इतकी आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

  • आंध्र प्रवेशात १४० किलोग्राम गांजा जप्त

आंध्र प्रदेशातील एलुरु जिल्ह्यातील पोलासनीपल्ली हाईवेवर पोलिसांनी वाहनांची तपासणी करत असताना एका कारमधून १४० किलोग्राम गांजा जप्त केला. याची किंमत दहा लाख रुपये इतकी आहे. या कारवाईत पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

error: Content is protected !!
Exit mobile version