आसाम-भुतान रेल्वे ‘लिंक’वर चर्चा सुरू असल्याची परराष्ट्र मंत्र्यांची माहिती

नवी दिल्ली, ७ ऑगस्ट २०२३ : देशाच्या सीमा मजबूत करण्यास सरकारचे प्राधान्य आहे. भूतान आणि आसाम दरम्यान रेल्वे लिंक करण्यासाठी चर्चा सुरू आहे. भारतातून येणाऱ्या पर्यटकांच्या स्वागतासाठी भूतान उत्सुक आहे. अशा प्रकारच्या रेल्वे मार्ग सुरू झाल्यास आसामच्या विकासासाठी ही एक सकारात्मक बाब ठरणार आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिली आहे.

यावेळी परराष्ट्रमंत्री म्हणाले की, भूतान आणि आसाम दरम्यान रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी आमची चर्चा सुरू आहे. चर्चेच्या २४ फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. आता कोणता निर्णय होणार याकडे आमचे लक्ष आहे. म्यानमार सोबतची सीमा परिस्थिती आव्हानात्मक आहे. सिटवे बंदर कार्यान्वित झाले आहे. या वर्षी किनारपट्टी शिपिंग करार पूर्ण होईल. अशी अशा आम्हाला आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीमुळे म्यानमार त्रिपक्षीय महामार्ग हे मोठे आव्हान असून आव्हानांचा सामना करण्यासाठी आम्ही म्यानमारच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहोत. तसेच चीनसोबतच्या बिघडत चाललेल्या संबंधावरही एस.जयशंकर म्हणाले की, भारत-चीन सीमेवरील चर्चा थांबलेली नाही. याबाबत लवकरच बैठक होणार आहे. गेल्या तीन वर्षांत सीमेवरील तणावात आम्ही बरीच सुधारणा केली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा