गोल पोस्ट राष्ट्रीय आसाम राज्य स्फोटांनी हादरले

आसाम राज्य स्फोटांनी हादरले

गुवाहाटी : देशात सर्वत्र प्रजासत्ताक दिनाचा उत्साह सुरू असताना आसाममध्ये मात्र चार शक्तिशाली ग्रेनेड हल्ल्यांनी हादरलं. यात चारपैकी तीन हल्ले हे दिब्रूगड येथे झाले तर, एक हल्ला चिरदेव जिल्ह्यात झाला. प्राथमिक स्तरावर हे स्फोट आसाममधील आसाममधील बंडखोर संघटना, युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ असाम-इंडिपेंडंट अर्थात उल्फा-आयकडून घडवल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३७ वर असणाऱ्या एका दुकानाजवळ एक स्फोट झाला. ज्या ठिकाणी पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला.
दुलीयाजान येथे झालेल्या आणखी एका स्फोटाची माहितीही पोलिसांना मिळाली. ज्याचा तपास अद्यापही सुरु आहे. विविध ठाकाणी झालेल्या या स्फोटांची माहिती मिळताच पोलीस पथकांनी तातड़ीने घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाईला सुरुवात केली.
प्रजासत्ताक दिनी झालेले हे स्फोट ग्रेनेड स्फोट असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आसामचे पोलीस महासंचालक भास्कर ज्योती महंत यांनी सांगितले की, या दोन्ही स्फोटांच्या घटनांची माहिती कळताच पोलिसांची एक चमू घटनास्थळी रवाना झाला. या स्फोटांमागे कोणाचा हात आहे याची चौकशी करण्यात येत आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version