जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यात भाजप नेत्याची हत्या

बांदीपोरा, ९ जुलै २०२० : काल रात्री जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी स्थानिक भाजप नेते शेख वसीम बारी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांना गोळ्या घालून ठार केले. रात्री ८:४५ च्या सुमारास बांदीपोरा येथील मुसलीमाबाद भागात त्यांच्या दुकान आणि निवास स्थानाबाहेर बारी व त्याच्या कुटुंबातील सदस्यांवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार ठार केले. बांदीपोरा पोलिस ठाण्याजवळ घडलेल्या घटनेत अतिरेक्यांनी वसीम बारीच्या भावावर आणि वडिलांवरही गोळीबार केला.गंभीर जखमी झाल्याने त्यांना दवाखान्यात हलविण्यात आले पण तिथे त्यांची प्राणज्योत मालवली.

वसीम बारी हे बांदीपोरा जिल्ह्याचे भाजपचे माजी अध्यक्षही होते.भाजप नेत्याच्या हत्येनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्याशी घटनेविषयी चर्चा केली. डॉ. सिंह यांनी ट्वीट केले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवर वसीम बारीच्या हत्येविषयी माहिती घेतली. यासह त्यांनी वसीमच्या कुटुंबीयांबद्दलही संवेदना व्यक्त केली. त्याचवेळी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात भाजप नेते वसीम बारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू पक्षासाठी मोठा तोटा आहे, त्याग व्यर्थ जाणार नाही.

भाजपाचे माजी अध्यक्ष वसीम बारी यांच्या सुरक्षा कर्मचार्‍यांना पोलिस कायद्यानुसार “निष्काळजीपणा” केल्याबद्दल आठही सुरक्षा कर्मचार्‍यांना अटक केली आहे.

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी बारीच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. हल्ल्यानंतर लगेचच अब्दुल्ला यांनी ट्वीट केले की, ‘आज संध्याकाळी बांदीपोरा येथे भाजपा नेता आणि त्याच्या वडिलांवर प्राणघातक दहशतवादी हल्ला झाल्याचे ऐकून वाईट वाटले. या हल्ल्याचा मी निषेध करतो. या शोकाच्या घटनेत त्यांच्या कुटुंबीयांबद्दल मी संवेदना व्यक्त करतो अशा शब्दात त्यांनी संवेदना व्यक्त केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा