क्रिकेटर सुरेश रैनाच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला, एकाचा मृत्यू

पठाणकोट, २९ ऑगस्ट २०२०: पठाणकोटच्या माधोपूर भागातील थरियाळ गावात अज्ञात हल्लेखोरांनी झोपलेल्या कुटुंबावर हल्ला केला. हे कुटुंब माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना यांच्या आत्त्याचे कुटुंब होते. या हल्ल्यात सुरेश रैनाचे काका ठार झाले आहेत, तर कुटुंबातील अन्य सदस्य गंभीर जखमी झाले. रैनाच्या आत्त्याची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या अजूनही रुग्णालयात आहेत. त्याचबरोबर हे कुटुंब रैना यांचे नातेवाईक असल्याचे समजल्यानंतर पोलिसांवर या प्रकरणाविषयी दबाव आहेच परंतु, अद्याप पोलिसांच्या हाती काहीही लागले नाही.

घटना १९ ऑगस्टची आहे. व्यवसायाने ठेकेदार अशोक कुमार यांचे संपूर्ण कुटुंब गच्चीवर झोपले होते. दरोडेखोरांनी घरात घुसून छतावर झोपलेल्या कुटुंबावर हल्ला केला. गाढ झोपे मुळे आणि अचानक झालेल्या हल्ल्यांपासून कुटुंबातील सदस्यांना स्वतःचे संरक्षणदेखील करता आले नाही. दरोडेखोरांनी धारदार शस्त्रांनी आणि रोड च्या सहायाने गंभीररीत्या वार केले. जखमींना तातडीने सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत सुरेश रैना चे काका तसेच कुटुंब प्रमुख अशोक कुमार (वय ५८) यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात त्यांची ५५ वर्षांची पत्नी आशा देवी आणि त्यांचा मुलगा कौशल कुमार (वय ३२), २४ वर्षीय सत्य कुमार, गंभीर जखमी झाले. यातील सत्यदेवी व अपीण कुमार बरे झाल्यानंतर घरी परत आले आहेत.
या घटनेनंतर पोलिस आणि फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहोचली. घराच्या प्रत्येक कोपऱ्याची बारकाईने तपासणी केली गेली आणि पुरावे जमा करण्यात आले. घराबाहेर काही अंतरावर मृत अशोक कुमार यांचे चेक बुक व इतर कागदपत्रे आढळून आली आहेत. हल्लेखोरांना ओळखण्यासाठी पोलिसांच्या पथकाने श्वानपथकाच्या मदतीने बारकाईने छाननी केली, परंतु अद्यापपर्यंत त्यांचा काहीही उलगडा झाला नाही.

सुरेश रैनाचा भाऊ दिनेश रैना यांनी फोनवर बोलताना सांगितले की इतके दिवस उलटले तरी अद्याप पोलिसांना मारेकऱ्यांना अटक करण्यात यश आले नाही. दिनेश म्हणाले की, या घटनेने संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे. आरोपींविरोधात त्वरित कारवाई करावी अशी मागणी त्यांनी पंजाब सरकारकडे केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा