नागालँड, मेघालय आणि त्रिपुरा या तीन राज्यांमधील विधानसभा निवडणूक कार्यक्रम आज जाहीर होणार?

नवी दिल्ली, १८ जानेवारी २०२३ : ईशान्येकडील नागालँड, मेघालय आणि त्रिपुरा या तीन राज्यांमधील विधानसभा निवडणूक कार्यक्रम आज जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणूक कार्यक्रमाची घोषणा आज दुपारी भारतीय निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषदेद्धारे करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारीमध्ये या तिन्ही राज्यांमध्ये निवडणूका होणार आहेत. दरम्यान, निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यापूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पथकाने नागालँड, मेघालय आणि त्रिपुराला भेट दिली. या काळात निवडणूक आयोगाने केंद्रीय सुरक्षा दलाशीही संपर्क साधल्याचे सांगितले आहे.

या सर्व राज्यांची परिस्थिती पाहता निवडणूक आयोग तारखा जाहीर करणार आहे. नागालँड, मेघालय आणि त्रिपुरा विधानसभेचा कार्यकाल क्रमश: १२ मार्च, २२ मार्च आणि १५ मार्चला पूर्ण होत आहे. त्यामुळे या राज्यांतील निवडणुकांसाठी स्थानिकांपासून ते राष्ट्रीय पक्षांनीही कंबर कसली आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा