पुणे, १३ ऑगस्ट २०२३ : अमेरिकेतील हवाई राज्यातील लाहैना (हवाई) येथे माउईच्या जंगलात लागलेल्या आगीत किमान ८९ जणांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली. जवळपास २१०० एकरवरील झाडं आणि २२०० हून अधिक घरं, गाड्या यात जळून खाक झाली आहेत. अमेरिकेच्या इतिहासातील एका शतकातील ही सर्वात प्राणघातक आग आहे.
यापूर्वी २०१८ मध्ये उत्तर कॅलिफोर्नियातील बुट्टे काउंटीच्या जंगलात लागलेल्या आगीत ८५ लोकांचा मृत्यू झाला होता. ही घटना ‘कॅम्प फायर’ म्हणून ओळखली जाते. याआधी १९१८ मध्ये मिनेसोटा येथील कार्लटन काउंटीमध्ये जंगलात लागलेल्या आगीत हजारो घरे जळून राख झाली होती आणि शेकडो लोकांना जीव गमवावा लागला होता.
याला ‘क्लोकेट फायर’ असे म्हणतात. अधिकाऱ्यांनी सांगितले की, वेस्ट माउच्या कानापाली येथे शुक्रवारी संध्याकाळी आग लागली, परंतु अधिकारी ती विझवण्यात यशस्वी झाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड