उत्तर प्रदेश, १३ एप्रिल २०२१: कोरोना महामारीमुळे देश पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.या विषाणु ला रोखण्यासाठी देशभरात ठिकठिकाणी लसीकरणला सुरवात झाली आहे.तर देशाचा अनेक भागात लशीचा तुटवडा देखील जाणवत आहे.या सर्व परिस्थितीचा विचार करता केंद्र सरकार आणखी काही चांगले पाऊले उचलण्याचा तयारीत आहेत.
लसीकरण जरी देशभरात होत आसले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ ते १५ तारखेपर्यंत डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त्याने लस उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे.पण उत्तर प्रदेश सरकारचा या बाबतीतला अतिशय ढिसाळ कारभार समोर आला आहे.ज्या मधे आरोग्य विभागाकडून नागरिकांच्या जीवाशी हेळसांड पणा होतानाचा प्रकार समोर आला आहे.
उत्तर प्रदेश मधील शामली गावात लसीकरण सुरू आसून तिथे तीन वृद्ध महिलांनाकोव्हिड ऐवजी कुत्रं चावल्यावर देण्यात येणारं रेबीज चं इंजेक्शन देण्यात आले आहे.हा घडलेला प्रकार तेव्हा उघडकीस आला जेव्हां या तीन वृद्ध महिलांची तब्येत अचानक खराब झाली.
सरोज,सत्यवथी,अनारकली असे रेबीजचं इंजेक्शन दिलेल्या महिलांची नावे आहेत.या तिन्ही महिला कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी शामली गावाच्या लसीकरण केंद्रात गेल्या होता.आणि तिथे कोव्हिड लस देण्याऐवजी रेबीजचं इंजेक्शन दिले गेले.ज्या नंतर महिलांना अचानक चक्कर येऊ लागली आणि तसेच त्यांना उलट्या होऊ लागल्या.
हा त्रास सुरू झाल्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आणि तिथे डाॅक्टरांना कोव्हिड लस घेतल्याचे सांगत ती रिस्पिट दाखवण्यात आली आणि तिथेच यांना कोरोना लसीऐवजी रेबीज इंजेक्शन दिल्याचे कळले.या सर्व घटनेनंतर दवाखान्यातील लस देणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित केले असून रूग्णालयाच्या सर्व प्रमुखांना समज देण्यात आला आहे.तसेच हा प्रकार आणखी किती नागरिकां बरोबर झाला आहे याचा शोध प्रशासन घेत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव