आता गुगल शिकवणार शब्दांचे उच्चार

50

गुगलने आता सर्च रिझल्टमध्ये कोणत्याही शब्दाचा उच्चार अचूकपणे शिकण्याची सुविधा देणारे फिचर युजर्ससाठी लॉन्च केले आहे.

गुगल आपल्या युजर्सला नवनवीन फिचर्स सादर करत असते. यामध्ये एका नाविन्यपूर्ण सुविधेची भर पडणार आहे. याविषयी गुगलने एका ब्लॉग पोस्टमधून माहिती दिली आहे.

त्यानुसार आता शब्दांचे उच्चार कसे असावेत असे सर्च केल्यास सर्च रिझल्टमध्ये पूर्वीप्रमाणे संबंधीत शब्दाचा उच्चार ध्वनीसह दिला आहे. शब्दाचा उच्चार अचूकपणे करण्याचा विभाग दिला आहे.

त्यांवर क्लिक केल्यास युजरला स्मार्टफोनच्या मायक्रोफोनवरून शब्दाचा उच्चार करावा लागेल. शब्दाचा उच्चार चूकल्यास लगेच सांगितले जाणार आहे. अचूक उच्चार केल्यास OK रिझल्ट दर्शविला जाईल.

यातूनच कुणीही गुगलसोबत बोलून शब्दाचा अचूक उच्चार शिकू शकतो. तसेच शब्दाचा उच्चार कसा करावा असे सर्च केल्यास त्या शब्दाशी संबंधीत प्रतिमा सर्च रिझल्टमध्ये दिसतील.