अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय ट्रस्ट स्थापन करण्याच्या निर्णयाचे स्वागत

पुणे, दि. २९ मे २०२० : सध्या जग कोरोना सारख्या महामारीचा सामना करत असताना सर्वांनाच अद्ययावत वैद्यकीय सुविधा व प्रशिक्षित डॉक्टर्स यांचे महत्व समजले आहे. तसेच या परिस्थितीत आपल्या पुणे शहरात अधिकाधिक वैद्यकीय सुविधांची व डॉक्टरांची गरज भासत आहे.

यासाठी पुणे महानगरपालिकेकडून सतत करण्यात येणाऱ्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. पुणे महापालिकेच्या माध्यमातून “भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय ” ट्रस्टच्या स्थापनेसाठी राज्य शासनाकडून मान्यता मिळाली आहे.

यामध्ये ५०० खाटा असणारे सुसज्ज आणि अद्ययावत रुग्णालय तसेच १०० विद्यार्थ्यांचे वैद्यकीय महाविद्यालय साकारण्यात येणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून होणारे हे वैद्यकीय महाविद्यालय निश्चितच पुण्याच्या शैक्षणिक परंपरेला नवीन उंची देईल तसेच शेकडो विद्यार्थ्यांना आणि रुग्णांना याचा लाभ होईल. पुणे महानगरपालिकेच्या या निर्णयाचे , अभाविप पुणे महानगर मंत्री अनिल ठोंबरे यांनी अभिनंदन केले आहे .

न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा