मुंबई: येत्या आठवडे भरात सत्ता स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल, अस म्हणत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला इशारा दिला आहे. एक वृत्त वाहिनीशी बोलतांना सुधीर मुनगंटीवार यांनी हे वक्तव्य केले आहे.
त्यामुळे आता शिवसेनेवर दबाव आणण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे आता चर्चेला चांगलेच उधाण आले आहे. पाच वर्षांपूर्वी ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. परंतु यंदा निवडणुकीचा निकाल लागून ९ दिवस झाले.पण तरीही अद्याप सरकार स्थापन झालेले नाही. भाजप आणि शिवसेनेमध्ये मंत्रीपदावरून रस्सीखेच सुरु आहे.
