गोल पोस्ट राजकारण शरद पवार नाशिक दौऱ्यावर.

शरद पवार नाशिक दौऱ्यावर.

नाशिक: गेल्या महिने भरापासून नाशिक जिल्ह्यात सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे जवळपास ६०टक्के पिकांचे नुकसान झाले आहे. त्यातच पाऊस थांबत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. या पावसाचा जवळपास साडेसात ते आठ लाख शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. त्यातले विविध भागांची पहाणी करणार आहेत.
अवकाळी पावसाने नुकसान झाल्याने जिल्हा प्रशासनाने पंचनामे सुरु केले आहेत.त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी काही ठिकाणी नुकसानग्रस्त भागाची पहाणी केली. आज संध्याकाळपर्यंत अधिकृत आकडेवारी जाहीर होणार आहे.
यंदा नाशिक जिल्ह्यात सरासरी पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे नाशिककरांनी पावसाचा चांगलाच धसका घेतला आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version