गोल पोस्ट स्पॉटलाइट सिनेमा “अतरंगी रे” चित्रपटामध्ये सारा अली खान दिसणार डबल रोलमध्ये

“अतरंगी रे” चित्रपटामध्ये सारा अली खान दिसणार डबल रोलमध्ये

मुंबई : अभिनेत्री सारा अली खानचा ‘लव्ह आज कल’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला येऊन गेला. मात्र हा चित्रपट फारसा यशस्वी कमाई करू शकला नाही.
आता तिचा ‘अतरंगी रे’ या आगामी चित्रपटात सारा डबल रोलमध्ये दिसणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
या चित्रपटात सारा अक्षकुमार आणि दक्षिणात्य स्टार धनुष या दोन हिरोंबरोबर २ वेगवेगळ्या भूमिकांत दिसणार आहे.
या दोन्ही हिरोंबरोबर भिन्न कालखंडामध्ये सारा रोमान्स करताना दिसणार आहे. एका बिहारमधल्या मुलीची तर दुसरीकडे एका दाक्षिणात्य मुलीची भूमिका सारा साकारणार आहे.
या चित्रपटाची कथा ‘क्रॉस कल्चर्ड लव्ह स्टोरी’ अशी असणार आहे. ही लव्ह स्टोरी एका वेगळ्यात युगातील कहाणी असणार आहे. त्यात अक्षकुमारचा आगळावेगळा लूक बघायला मिळणार आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version