गोल पोस्ट स्पॉटलाइट सिनेमा ‘बधाई हो’च्या सिक्वेलमध्ये “या” अभिनेत्याची एन्ट्री

‘बधाई हो’च्या सिक्वेलमध्ये “या” अभिनेत्याची एन्ट्री

मुंबई:आयुष्यमान खुराणाची महत्वाची भूमिका असलेला ‘बधाई हो’ हा चित्रपट २०१८ मध्ये आला होता. तो प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरला होता.
मात्र आता या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये अभिनेता राजकुमार राव मुख्य भूमिका निभावणार असल्याची माहिती मिळत आहे.
‘बधाई हो’च्या सिक्वेलमध्ये अभिनेता राजकुमार राव दिसणार असून त्याच्यासोबत अभिनेत्री भूमी पेडणेकर देखील झळकणार आहे.
या चित्रपटात राजकुमार राव एका पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे, तर भूमी पीटी शिक्षकेच्या भूमिकेत दिसेल.
दरम्यान, या चित्रपटाचं शूटिंग जूनमध्ये सुरू होणार असून २०२१ मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version