पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून हल्ला

6

सोलापूर, दि.२९ एप्रिल २०२० : माळशिरस तालुक्यातील वेळापूर पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्याला मळोली येथे मंगळवारी (दि.२८) रोजी मारहाण झाल्याची घटना घडली आहे. जावेद नजीर जमादार असे मारहाण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेळापुर पोलीस स्टेशनच्या साळमुख बिट अंमलदारास मदतनीस म्हणून नेमणूकीस असलेले कर्मचारी जावेद नजीर जमादार हे मळोली गावामध्ये पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी आरोपी अरुण सिंह फत्तेसिंह जाधव रा.मळोली याने कारमधून येऊन जातीवाचक शिवीगाळ केली. काही दिवसांपूर्वी साळमुख येथील भावाचे हॉटेल चेक केल्याचा राग मनात धरून २८ एप्रिल रोजी रात्री ९ च्या सुमारास मळोली येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रवेशद्वारासमोर लाथा बुक्क्यांने, हाताने मारहाण करत ब्लेडने हातावर, तोंडावर वार करून जखमी करून फिर्यादीचा मोबाईल फोडून, अंगावर पेट्रोल टाकण्याचा त्याने प्रयत्न केला.

या प्रकरणी वेळापूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून आरोपी अरुण सिंह फत्तेसिंह जाधव यास अटक केल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक दीपक जाधव यांनी दिली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा