जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबेंवर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्लेखोर ताब्यात

जपान, 8 जुलै 2022: जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची प्रकृती सध्या अत्यंत नाजूक आहे. 67 वर्षीय शिंजो यांच्यावर आज एका रॅलीत भाषणादरम्यान हल्ला करण्यात आला. येथे शिंजो आबे यांच्या मागे उभ्या असलेल्या हल्लेखोराने दोन गोळ्या झाडल्या, त्यानंतर ते जमिनीवर पडले. संशयित हल्लेखोराला घटनास्थळावरूनच पकडण्यात आलं. आता त्याच्याबद्दल वेगळीच माहिती समोर येत आहे.

संशयित हल्लेखोराचं वय 41 वर्षे असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याचं नाव यामागामी तेत्सुया (Yamagami Tetsuya) असं आहे. त्याच्यावर आता खुनाच्या प्रयत्नाचे कलम लावण्यात आले आहे. हल्लेखोर सेल्फ डिफेन्स फोर्सचा सदस्य होता. घटनास्थळावरून ज्या बंदुकीतून हल्ला करण्यात आला, ती बंदूक जप्त करण्यात आली आहे. ती शॉटगन आहे.

संशयित यामागामी तेत्सुया हा नारा सिटीचा रहिवासी आहे. वृत्तानुसार, संशयित हा सागरी सेल्फ डिफेन्स फोर्समध्ये राहत होता. 2005 पर्यंत जवळपास तीन वर्षे त्यानी तिथं काम केलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान यामागामी तेत्सुयाने सांगितलं की, त्याला माजी पंतप्रधानांच्या काही गोष्टींचा राग होता आणि त्यांना मारायचं होतं.

जेव्हा गोळी झाडण्यात आली तेव्हा शिन्झो आबे यांच्या आजूबाजूचे सर्वजण घाबरले. त्यांना लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, पण इतक्या वेळात त्यांच्या शरीरातून खूप रक्त वाहत होते.

हल्लेखोराने या हल्ल्याची आधीच योजना आखली असावी. कारण शिंजो आबे यांचा ताफा आज नारा शहरामध्ये येणार होता. गुरुवारीच लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाने त्यांच्या समर्थकांना ही माहिती दिली.

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे (वय 67 वर्षे) यांची गोळी लागल्यानं प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्या हृदयाने काम करणं बंद केलं आहे. त्यांना श्वास घेता येत नव्हता. सध्या त्यांना दुसऱ्या रुग्णालयात (नारा मेडिकल युनिव्हर्सिटी हॉस्पिटल) हलवण्यात आले आहे.

शिंजो आबे यांच्यावर हा हल्ला नारा शहरात झाला. जपानमध्ये रविवारी वरिष्ठ सभागृहाच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी शिंजो आबे तेथे प्रचार करत होते. भाषणादरम्यानच हा हल्ला झाला. शिंजो आबे अचानक पडल्यामुळे तिथे उपस्थित लोकांना काहीच समजले नाही. मात्र यादरम्यान काही लोकांनी तेथे गोळीबार केल्यासारखे आवाज ऐकू आले. आबे यांना गोळ्या लागल्याचे नंतर स्पष्ट झाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा